भेंडमळा ब्राह्मण देवस्थान वर्धापनदिन

भेंडमळा ब्राह्मण देवस्थान वर्धापनदिन

*कोंकण एक्सप्रेस*

*भेंडमळा ब्राह्मण देवस्थान वर्धापनदिन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

भेंडमळा येथील श्री देव ब्राह्मण देवस्थानचा वर्धापनदिन सोहळा 20 व 21 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यानिमित्त दि. 20 रोजी सकाळी पूजा, सायं. 6 वा. श्री देव ब्राह्मण प्रासादिक मंडळाचे (भेंडमळा) भजन, सायं. 7 वा. जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा ‘दख्खनचा राजा ज्योतिबा माझा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. दि. 21 रोजी सकाळी 9 वा. धार्मिक विधी, श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायं. 7 वा. श्री देव ब्राह्मण प्रासादिक मंडळाचे (भेंडमळा) भजन, सायं. 8 वा. श्री देव ब्राह्मणाच्या फळप्रसादाचा लिलाव, रात्रौ 9 वा. पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!