घावनळे येथील माजी जि. प.सदस्य कै.आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त डबलबारी भजनाचा सामना

घावनळे येथील माजी जि. प.सदस्य कै.आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त डबलबारी भजनाचा सामना

*कोंकण एक्सप्रेस*

*घावनळे येथील माजी जि. प.सदस्य कै.आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त डबलबारी भजनाचा सामना*

*मा.आ. वैभव नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ*

घावनळे राष्ट्रीय काँग्रेस,घावनळे विकास मंडळ आणि कै.आबा मुंज, गुरु मुंज वेलफेअर फाऊंडेशन ग्रुप घावनळे यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य कै. आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त घावनळे येथे डबलबारी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याचा शुभारंभ माजी आमदार वैभव नाईक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वैभव नाईक म्हणाले, आबा मुंज यांनी अनेक कार्यकर्ते घडविले आहेत.अनेक लोकांची त्यांनी छोटी मोठी कामे केली ती आजही लोकांच्या स्मरणात आहेत. सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते. आबा मुंज यांनी काँग्रेस पक्षाचा एक ध्येयवेडा कार्यकर्ता म्हणून काम केले असून त्यांचे काम सर्वांनी पुढे न्यायचे आहे. असे सांगत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रकाश जैतापकर,कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, विधाता सावंत,विद्याप्रसाद बांदेकर,विजय प्रभू, संतोष मुंज, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालूका संघटक बबन बोभाटे,कुडाळ पंचायत समिती शिवसेना गटनेते योगेश धुरी,सुधीर राऊळ,माणगाव उपसरपंच बापू बागवे,पप्पू म्हाडेश्वर,पांडू खोचरे,बच्चू नाईक,दीपक सावंत,संतोष नागवेकर,प्रवीण कदम,आनंद परब,आनंद नेवगी,सुनील खोचरे,चिराग मुंज,बाबू शेळके,महेश पालव,कांता झोरे,मधुकर घाडी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!