मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्या-नगरसेवक सुषमा खानोलकर

मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्या-नगरसेवक सुषमा खानोलकर

*कोंकण एक्सप्रेस*

*मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्या-नगरसेवक सुषमा खानोलकर*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)* 

मुले अलिकडे अभ्यासामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवितात. अभ्यासासोबतच मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे प्रतिपादन नगरसेवक ॲड. प्रभूखानोलकर यांनी शिशूवाटिकेच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षिस वितरण प्रसंगी केले.
वेंगुर्ला येथील सरस्वती शिशूवाटिकेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षिस वितरण समारंभ 5 एप्रिल रोजी येथील नगरवाचनालय संस्थेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाले. यावेळी व्यासपिठावर नगरसेवक ॲड.सुषमा प्रभूखानोलकर, निवृत्त प्राध्यापक महेश बोवलेकर, पत्रकार प्रथमेश गुरव, पालक प्रतिनिधी स्वाती गावडे, संदिप डेकोरेटर्सचे रामदास हळदणकर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुले ही अनुकरणप्रिय असतात. त्यांना नेहमी आनंदीत ठेवा. परिसराची नुसती माहिती न देता त्यांना प्रत्यक्ष गडकिल्ल्यांची, झाडांची तसेच शेतीची माहिती द्या. ज्या व्यक्तींनी चांगले काम केले आहे, त्या व्यक्तींच्या कार्याची ओळख करून द्या. त्यातूनच मुले घडत जातात, असे मार्गदर्शन निवृत्त प्राध्यापक महेश बोवलेकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते मुलांना बक्षिस वितरण करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत शिशूवाटिकेच्या संचालिका दिप्ती मांजरेकर-उडीयार यांनी केले. बक्षिस वितरणानंतर शिशूवाटिकेच्या मनस्वी पालकर, शौर्या धुरी, हर्ष देऊलकर, युवांश वेंगुर्लेकर, परम दाभोलकर, विहान आंदुर्लेकर, शिवम परब, राजविर खापरे, गौरांग साळगांवकर, दियान वेर्णेकर, युवराज कामत, विज्वल कोचरेकर, मृणालिनी ओगले, स्वरा प्रभू, वर्णिका वेंगुर्लेकर, वेदश्री मालवणकर, मिथिल दाभोलकर, दुर्वांक बिजितकर या छोट्या मुलांनी एकापेक्षा एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद देत त्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन मेघा घाडी हिने केले. यावेळी पालक, शिक्षणप्रेमी आणि हितचिंतक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!