खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत दशावतार नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत दशावतार नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत दशावतार नाट्य महोत्सवाचा शुभारंभ*

*कणकवली ः संजना हळदिवे*

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचा रविवारी कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, आशिये सरपंच महेश गुरव, शहराध्यक्ष अण्णा कोदे, लवू परब, जिल्हा बँक संचालक समीर सावंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

रविवारी ५ एप्रिल ते गुरुवारी ९ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात दररोज सायंकाळी विविध दर्जेदार दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी नागरिक व कला रसिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली असून, आगामी दिवसांतही मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!