*कोंकण एक्सप्रेस*
*इंडियान ओलिंपियाड परीक्षेत प्रि.एम.आर.देसाई स्कूलचे यश*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
इंडियान टॅलेंट ओलिंपियाडतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रि.एम.आर.देसाई स्कूलचा इयत्ता सहावीमधील विद्यार्थी कु. शौर्य शंकर मांजरेकर हा विज्ञान विषयात राज्यात 6वा आला असून त्याला 700 रूपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर पल्लव संजय मेस्त्री याने गणित विषयात राज्यात 12 क्रमांक पटकावित एक्सिलेंस मेडल अवॉर्ड पटकावला आहे. या दोन्ही विद्याथ्र्यांचा मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आले

