कलमठमध्ये  राम नवमी उत्सव

कलमठमध्ये  राम नवमी उत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*कलमठमध्ये  राम नवमी उत्सव*

*कणकवली : सौ. संजना हळदिवे*

कलमठ बाजारपेठ येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात गुरुवार २६ मार्च श्री राम जन्मोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. घट स्थापना, ११ वा. श्री राम जन्मोत्सवावर कीर्तन, १२ वा. श्री राम जन्मोत्सव सोहळा, सायंकाळी भजनांचा कार्यक्रम व राम रक्षा स्त्रोत्र पठण, रंगभूषा, वेशभूषा स्पर्धा होणार आहे. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केले आहे.
……………
कलमठमध्ये उद्या विविध स्पर्धा
कणकवली : रामनवमीनिमित्त कलमठ बाजारपेठ येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्यावतीने गुरुवार २६ मार्च रोजी सायंकाळी सायंकाळी ६ वा. मंदिरात ग्गाव मर्यादित रामरक्षा स्त्रोत्र पठण, रंगभूषा, वेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
रामरक्षा स्त्रोत्र पठण स्पर्धेकरिता अनुक्रमे १००१ रु., ७०१ रु., ५०१ रु. व सन्मानचिन्ह, प्रमाणापत्र अशी बक्षिसे आहेत. रंगभूषा, वेशभूषा स्पर्धेकरिता अनुक्रमे १००१ रु., ७०१ रु., ५०१ रु. व सन्मानचिन्ह, प्रमाणापत्र अशी बक्षिसे आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तनोज कळसुलकर, धीरज मेस्त्री, प्रसाद मठकर, निश्चय हुन्नरे यांच्याकडे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!