*कोकण Express*
*कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्टमध्ये ५ पॉझिटिव्ह*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहरातील पटवर्धन चौकात आजरॅपिड टेस्ट मध्ये ५ कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यात तरंदळे गावातील तीन जण असून कणकवली शहरातील एक युवक आणि शिवडाव मधील व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे आज सकाळपासून दुपारपर्यंत कणकवली पटवर्धन चौकात एकूण सहा रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यातील पाच जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाचे सुविधा सावंत, नंदकुमार सरंगणे, अरविंद गवळी यांनी केल्या आहेत.