*कोंकण एक्सप्रेस*
*लोकसभा–राज्यसभेत हॅट्रीक; डॉ. रामदास आठवले यांचे सौ. ज्योती जाधव यांच्याकडून अभिनंदन..*
*दोडामार्ग : शुभम गवस*
डॉ. रामदास आठवले हे तिसऱ्यांदा भारताच्या राज्यसभेत बिनविरोध निवडून आल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा कसई-दोडामार्गच्या नगरसेविका सौ. ज्योती रमाकांत जाधव यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
महामानव B. R. Ambedkar यांच्या विचारसरणीवर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय स्तरावर खंबीर नेतृत्व डॉ. आठवले करीत आहेत. दलित, बहुजन व कष्टकरी जनतेचे ते विश्वासू नेते असून तळागाळातील जनतेच्या न्यायहक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला आहे, असे सौ. जाधव यांनी सांगितले.
डॉ. आठवले यापूर्वी महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री म्हणून कार्यरत होते तसेच ते तीन वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. आता तिसऱ्यांदा राज्यसभेत निवडून येत त्यांनी लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांत हॅट्रीक साधली आहे. त्यांच्या या यशाबद्दल देशभरातून अभिनंदन व स्वागत होत असल्याचे सौ. जाधव यांनी नमूद केले.
भारतीय दलित पँथर सारख्या लढाऊ संघटनेचे सुरुवातीच्या काळात नेतृत्व करत त्यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. देशपातळीवरील चळवळीतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.
सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी डॉ. आठवले सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्यशैलीमुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असून भविष्यात त्यांनी देशाचे कॅबिनेट मंत्री व्हावे, अशी अपेक्षा सौ. ज्योती जाधव यांनी व्यक्त केली.

