*कोंकण एक्सप्रेस*
*महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांची सुरुवात करण्यात असून खर्डेकर महाविद्यालयात अन्नप्रक्रिया
(बेकरी उत्पादन) प्रशिक्षण, उभादांडा व आसोली येथे पापड व लोणचे तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन खर्डेकर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्राध्यापक एस. एस. माने, संस्था प्रतिनिधी प्रा. वीरेंद्र देसाई, माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, प्रगती विवेक चव्हाण, प्रशिक्षिका प्रियांका शेट्ये, वेताळ प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सचिन परूळकर, डॉ. जी. पी. धुरी तसेच ग्रामीण विकास विभागाचे डॉ.विवेक चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा उपक्रम खर्डेकर महाविद्यालयाचा ग्रामीण विकास विभाग, वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग–तुळस व जीवनदायी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जनशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

