*कोंकण एक्सप्रेस*
*वेशभूषा व अभिनय स्पर्धेत वरदा परब आणि ज्ञाने·ारी तांडेल प्रथम*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने हिंदू धर्माभिमानी मंडळींतर्फे दोन गटांत घेण्यात आलेल्या वेशभूषा व अभिनय सादरीकरण स्पर्धेत वरदा परब आणि ज्ञाने·ारी तांडेल यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
येथील रामे·ार मंदिरात पार पडलेल्या या स्पर्धेत बहुसंख्य स्पर्धकांचा प्रतिसाद लाभला. स्पर्धकांनी रामायण, महाभारत तसेच इतिहास आणि संत परपंरेतील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे प्रभावी सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेचा गटवार निकाल पुढीलप्रमाणे – पहिली ते पाचवी – प्रथम – ज्ञाने·ारी तांडेल (श्री शिवाजी हाय.तुळस), द्वितीय – प्रांजल नार्वेकर (उभादांडा नं.3), तृतीय-सान्वी रजपूत (वेंगुर्ला नं.1), उत्तेजनार्थ-अध्या खापरे (वेंगुर्ला नं.1), सान्वी परब (परबवाडा नं.1) तर सहावी ते दहावी – प्रथम – वरदा परब (वेंगुर्ला हाय.), द्वितीय-श्राव्या कांबळी (पाटकर हाय.), तृतीय-काशिनाथ तेंडोलकर (मठ हाय.), उत्तेजनार्थ – यश सावंत (न्यू.इं.स्कूल उभादांडा) व गुरूदेव दामले (पाटकर हाय.) यांनी पटकाविला.
स्पर्धेचे परीक्षण बाळू खांबकर, संजय पुनाळेकर, सहदेव परब आणि महेश बोवलेकर यांनी केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा तसेच ोशभूषा व अभिनय सादरीकरण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हिंदू धर्माभिमानी मंडळींनी परिश्रम घेतले.

