भव्य स्वागत यात्रेने वेंगुर्ल्यात नविन वर्षाचे स्वागत

भव्य स्वागत यात्रेने वेंगुर्ल्यात नविन वर्षाचे स्वागत

*कोंकण एकस्प्रेस*

*भव्य स्वागत यात्रेने वेंगुर्ल्यात नविन वर्षाचे स्वागत*

*समई आणि लेझिम नृत्याने मिळविली वाहवा*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वेंगुर्ला शहरात गुरूवारी सायंकाळी ढोल-ताशे, सनईच्या मधुर वाद्यात काढण्यात आलेली स्वागतयात्रेत बहुसंख्य नागरिकांनी आपला सहभाग दर्शवित यशस्वी केली. तर पारंपारिक वेशभूषा, लेझिम आणि समईनृत्य लक्षवेधी ठरले.
दरवर्षीप्रमाणे वेंगुर्ला येथील हिंदू धर्माभिमानी मंडळींनी याहीवर्षी मराठी नविन वर्षाच्या स्वागतासाठी गुरूवारी सायंकाळी भव्य स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. स्वागतयात्रेच्या प्रारंभी नूतन वर्ष सर्वांना सुख, समृद्धीचे जावो, रोगराई नष्ट होवोत यासाठी ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ ठेऊन सांगणे करण्यात आले. त्यानंतर तुतारी वाजवून स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. श्री रामेश्वर मंदिराकडून निघालेली ही स्वागतयात्रा शिरोडा नाका, दाभोली नाका, बाजारपेठ, मारुती स्टॉप मार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर येथे आल्यानंतर यात्रेची सांगता झाली.
या स्वागतयात्रेत पौराणिक आणि काल्पनिक वेशभूषा केलेली लहान मुले, रविंद्र पणशीकर यांनी केलेली शंख फुखणा-या कृष्णाची वेशभूषा, चांदेरकर महाराज यांचा वारकरी परिवार, मठ येथील विद्याथ्र्यांचे लेझिम पथक, तुळस येथील महिलांचे समईनृत्य यांच्यासह पारंपारिक वेशातील स्त्री पुरूष सहभागी झाले होते. दरम्यान, चौकाचौकात लेझिम आणि समई नृत्य करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
फोटोओळी – 1) वेंगुर्ला येथील नविन वर्षाच्या स्वागतासाठी भव्य स्वागतयात्रा काढण्यात आली. 2) स्वागतयात्रेत तुळस येथील महिलांनी उत्कृष्ट समई नृत्य सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!