*कोंकण एक्सप्रेस*
*108 रूग्णवाहिकेतच गर्भवती महिलेची केली प्रसुती*
*वेंगुर्ला प्रतिनिधी -प्रथमेश गुरव*
ग्रामीण भागातील एका गर्भवती महिलेला तीव्र स्वरूपाच्या प्रसुती कळा सुरू झाल्याने तिला तातडीने रूग्णालयात हलविणे शक्य नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्या महिलेची 108 रूग्णवाहिकेतच प्रसुती करण्यात आली. त्या महिलेने गोंडस कन्येला जन्म दिला असून बाळ आणि तिची आई दोघेही सुखरूप असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
हिंदू नववर्षाच्या प्रारंभी रूग्णवाहिकेतच प्रसुती होण्याची घटना घडली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गावातील एक महिलेला गुरूवारी सकाळी प्रसुत वेदना सुरू झाल्या. संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी 108 रूग्णवाहिकेला आपत्कालीन कॉल करून याबाबत माहिती दिली. सुदैवाने 108 रूग्णवाहिका गोवा-बांबुळी येथून नुकतीच वेंगुर्ला येथे आली होती. आपत्कालीन कॉल प्राप्त होताच 108 तात्काळ रूग्णापर्यंत पोहचली. गर्भवती महिलेची प्रकृती पाहून तिला रूग्णालयात हलवणे शक्य नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ईएमएसओ डॉ. ज्ञाने·ार पांचाळ आणि रूग्णवाहिका चालक साईसिद्धेश मेस्त्री यांनी रूग्णवाहिकेतच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांचया मार्गदर्शनाखाली आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ही प्रसूती यशस्वी पार पडली. प्रसुतीनंतर माता व बालकाला पुढील उपचारासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रूगणालया दाखल करण्यात आले. 108 सेवेमधील डॉक्टर व चालकांची वेळेत मदत झाल्याने आई आणि बाळ सुरक्षित राहिल्याने नातेवाईकांनी त्यांचे मनापासून आभार मानले.
फोटोओळी – गर्भवती महिलेची 108 रूग्णवाहिकेत प्रसुती करण्यात आली.

