*कोंकण एक्सप्रेस*
*केर गाव आपल्या अनेक आदर्श गुण वैशिष्ट्यांमुळे सुपरिचित – सौ. गीतांजली सातार्डेकर*
*दोडामार्ग – शुभम गवस*
केर गाव आपल्या अनेक आदर्श गुण वैशिष्ट्यांमुळे सुपरिचित असून महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम स्तुत्य आहे. यानिमित्ताने महिलांना सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळाले. याबरोबरच बिनविरोध ग्रामपंचायत आणि लोकाभिमुख प्रशासन हे गावाला भूषणावह व इतरांसाठी प्रेरक आहे असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षिका सौं. गीतांजली सातार्डेकर यांनी केले.
केर – भेकुर्ली ग्रामपंचायत येथे डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्ट, व्होलंटरी हेल्थ असोसीएशन गोवा यांनी महिला दिन आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या. सौ. सातार्डेकर यांनी यावेळी काल, आज आणि उद्या अशी स्त्री रूपे उलगडून सांगितली यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. सायली निंबाळकर,व्होलंटरी हेल्थ असोसीएशन गोवा चे कार्यक्रम व्यवस्थापक विकास कुलकर्णी, उमेद अभियान साटेली – भेडशी प्रभाग समन्वयक सौ. अपर्णा अशोक भंडारी, विस्तार अधिकारी सुजित गायकवाड, पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, सरपंच सौं. रुक्मिणी नाईक, ग्रामपंचायत अधिकारी संदीप पाटील, मोर्ले उपसरपंच संतोष मोर्ये आदी सह ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रिया देसाई, प्रास्ताविक विकास कुलकर्णी यांनी केले.
(१३ शेतकरी महिलांचा विशेष सन्मान)
तत्कालीन प्रौढ साक्षरता अभियानात काम केल्याबद्दल सपना तुकाराम देसाई, गावठी औषध वैद्य देणाऱ्या अनुक्रमे शिल्पा बाबली देसाई, रुपाली रमेश देसाई, शुभदा शिवराम देसाई, सुवर्णा चंद्रकांत देसाई, द्रौपदी अर्जुन देसाई, लक्ष्मी शांताराम देसाई, विजया विष्णू देसाई, पोषण आहार सहकार्य रेश्मा रविकांत देसाई, नम्रता न्हानु देसाई तर बचत गट क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्कर्षा उमेश देसाई, प्रिया लक्ष्मण देसाई, नम्रता नंदकुमार देसाई या शेतकरी कुटुंबातील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
( सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळातुन मनोरंजन )
ग्रामीण भागातील महिला शेती आणि घरकाम यात नेहमी व्यस्त असतात. त्यातून वेळ काढून महिलांना करमणूक व्हावी यासाठी दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध खेळ आयोजित केले होते यामध्ये मोठया संख्येने महिलांनी सहभाग घेतला. व्होलंटरी हेल्थ असोसीएशन गोवा च्या अकाउंट्स अधिकारी सुश्मिता सिंग, सहाय्यक अधिकारी गॅब्रीएल, समन्वयक आरती नाईक , वैद्यकीय अधिकारी आणि ईतर कर्मचारी वर्गही उत्साहाने सामील झाले होते.
(केर भेकुर्ली ग्रामपंचायतचे उपक्रम आदर्शवत – सौ. सायली निंबाळकर)
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. सायली निंबाळकर यांनी केर – भेकुर्ली ग्रामपंचायत घेत असलेले उपक्रम आदर्शवत असून गावच्या सांघिक एकीचे कौतुक केले.

