गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत सासोली-हेदुस, वाघमळा शाळेचे घवघवीत यश

गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत सासोली-हेदुस, वाघमळा शाळेचे घवघवीत यश

*कोंकण एक्सप्रेस*

*गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत सासोली-हेदुस, वाघमळा शाळेचे घवघवीत यश*

*दोडामार्ग – शुभम गवस*

गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर आयोजित गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा (G.T.S.) २०२५-२६ मध्ये दोडामार्ग तालुक्यातील जि. प प्राथमिक शाळा सासोली-हेदुस, वाघमळा येथील शाळेने घवघवीत यश संपादन केले. ग्रामीण भागातील शाळा असून नेत्रदीपक यश मिळाल्यामुळे पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामध्ये इयत्ता दुसरीतील कुमारी उत्कर्षां किरण सुतार हिने १०० पैकी ९८ गुण मिळवत सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर १ ला क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यस्तरावर २ रा क्रमांक पटकवला.
कुमारी शौर्या भूषण सावंत हिने १०० पैकी ७४ गुण मिळवत सिधुदुर्ग जिल्हा स्तरावर ९ वा तर महाराष्ट्र राज्य स्तरावर १४ वा क्रमांक प्राप्त केला.
कुमारी स्वरा संजीवन गवस हिने १०० पैकी ६८ गुण मिळवत दोडामार्ग तालुका स्तरावर ४ था क्रमांक मिळविला. इयत्ता तिसरीतील विद्यार्थी कुमार चैतन्य अमरनाथ कासार याने ३०० पैकी २०८ गुण मिळवत दोडामार्ग तालुका स्तरावर ४ था क्रमांक पटकवला
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे त्याच प्रमाणे विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक व पालकाचं देखील विशेष अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!