जिल्हास्तरीय सिंधू सरस मिनी सरस कार्यक्रम २१ मार्च पासून कुडाळ येथे

जिल्हास्तरीय सिंधू सरस मिनी सरस कार्यक्रम २१ मार्च पासून कुडाळ येथे

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हास्तरीय सिंधू सरस मिनी सरस कार्यक्रम २१ मार्च पासून कुडाळ येथे*

*जिल्ह्यातीलबचत गटांच्या उत्पादनाची आणि जिल्ह्याची आर्थिक उन्नती साधणारा सिंधू सरस – प्रमोद कामत*

*सिधुदुर्गनगरी १७*

जिल्ह्यातील बचत गट शेतकरी नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधी नी २१ ते २५ मार्च दरम्यान होणाऱ्या जिल्हास्तरीय सिंधू सरस व मिनी सरस २०२६या कार्यक्रमात सहभागी होऊन बचत गटांच्या आणि जिल्ह्याचे आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादासाईल यांनी सयुक्त पत्रकार परिषदेत दिली .
सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या दालनात ग्रामीण विकास व पंचायत राज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सिंधू सरस्विनी सरस २०२६ च्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जि प अध्यक्ष प्रमोद कामत उपाध्यक्ष दादा साईलयांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब आदींसह उपस्थित होते .
ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच् ।या कौशल्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत सिंधुदुर्ग सरस महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. २१ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत कुडाळ येथे होणार आहे.
महोत्सवात जिल्हाभरातील महिला बचत गटांकडून विविध खाद्यपदार्थ, काजू, आंबा, मसाले, हातमाग उत्पादने तसेच इतर ग्रामीण उत्पादने यांचे ७० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.
महोत्सवाच्या उद्घाटनदिनी (२१ मार्च) बचत गटांच्या महिलांची उपस्थिती अपेक्षित असून, विविध स्पर्धा व सायंकाळी समूह नृत्य सादर होणार आहे. २२ मार्च रोजी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतीविषयक शिबिरे आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ मार्चला बँकिंग व ग्रामपंचायत विषयक कार्यशाळा, महिला गट नृत्य स्पर्धा आणि रात्री पारंपरिक दशावतार नाट्य सादर होणार आहे.
२४ मार्च रोजी महिला व बाल विकास आणि आरोग्य विषयक कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक सादरीकरणे होतील. तर २५ मार्च रोजी बक्षीस वितरण समारंभ, आढावा बैठक आणि महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिक बळकटी मिळण्यासोबतच त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जि प अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!