*कोंकण एक्सप्रेस*
*विविध कार्यक्रमांनी वेंगुर्ला शाळा नं.4 मध्ये महिला दिन संपन्न*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
वेंगुर्ला शाळा नं.4 मध्ये मातांसाठी पाककला स्पर्धांसहीत फनीगेम्स घेऊन जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी विद्याथ्र्यांनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले. त्यानंतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या सामाजिक कार्यकत्र्या प्रज्ञा परब यांचा तसेच शाळेच्या स्वयंपाकी श्रद्धा वेंगुर्लेकर व मदतनीस समृद्धी परब यांचा तर शासनाच्या परिपत्रकानुसार इयत्ता पहिली ते तिसरीच्या “निपुण भारत’ उपक्रमांतर्गत मातांमधून निवडलेल्या मेघना राऊळ, राधिका नेरूरकर आणि इमले यांचा सत्कार करण्यात आला. प्रज्ञा परब यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगून महिलांनी समाजकार्यात सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. नगरसेवक आकांक्षा परब यांनीही मनोगत व्यक्त करून शाळेच्या प्रशस्त हॉलसाठी पाच सिलिंग फॅन देण्याचे आ·ाासन दिले. तर नगरेवक समिधा रेडकर आणि वृंदा गवंडळकर यांनीही उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.जाई नाईक यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. माता पालकांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत 30 जणांनी सहभाग घेतला. यातील सहभागी मातांना सुपारीचे झाड देऊन सन्मान केला.
या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अजित राऊळ, उपाध्यक्ष हर्षद परब, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्यासह माता पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानिका कदम यांनी, सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष परब यांनी केले.
फोटोओळी – महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रज्ञा परब यांच्या हस्ते झाले.

