आदिशक्ती अभियानात वेंगुर्ला तालुकास्तरावर केळुस ग्रामपंचायत प्रथम

आदिशक्ती अभियानात वेंगुर्ला तालुकास्तरावर केळुस ग्रामपंचायत प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*आदिशक्ती अभियानात वेंगुर्ला तालुकास्तरावर केळुस ग्रामपंचायत प्रथम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

आदिशक्ती अभियानात वेंगुर्ला तालुकास्तरावर केळुस ग्रामपंचायत प्रथम, पेंडूर द्वितीय तर ग्रामपंचायत अणसूर यांना तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आले.
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सन 2025-26 पासून आदिशक्ती अभियान राबविणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणे कार्यक्रम जाहीर केला आहे. या अंतर्गत महिला व बालक यांच्या आर्थिक सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी हे अभियान राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर राबविणेबाबत शासनस्तरावरून कळविण्यात आलेले होते. त्यानुसार अभियानाच्या अनुषंगाने वेंगुर्ला तालुकास्तरीय कमिटी तयार करण्यात आली होती. ग्रामस्तरावर ग्रामपंचायत कार्यालयामार्फत कामकाजाच्या अपुषंगाने सादर केलेल्या ऑनलाईन प्रस्तावापैकी गुणानुक्रमे नऊ प्रस्तावाचे मुल्यमापन या समितीकडून करण्यात आले. ज्या ग्रामपंचायतींना जादा गुण मिळाले अशा तीन ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. त्यामध्ये गुणानुक्रमे ग्रामपंचायत केळूस प्रथम, ग्रामपंचायत पेंडूर द्वितीय व ग्रामपंचायत अणसूर तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आले. या विजेत्या तिन्ही ग्रामपंचायतींना पंचायत समिती सभापतीशंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!