शिवसेना उपनेते संजय आग्रे यांची मुंबईत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट; शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत चर्चा

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांची मुंबईत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट; शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत चर्चा

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना उपनेते संजय आग्रे यांची मुंबईत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट; शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत चर्चा*

*मुंबई, दि. १२/०३/२०२६ :*

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आज मुंबई येथे राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत तसेच विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांशी संबंधित अडचणी, अनुदानासंदर्भातील विषय तसेच शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी स्वतंत्र आढावा बैठक आयोजित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले व शिवसेना विधानसभा प्रमुख संदेश पटेल उपस्थित होते. चालू अधिवेशन संपल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येऊन शिक्षण विभागासंदर्भात आढावा बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!