मुंबईत बीएमसी ने रचले आहेत मृत्यूचे सापळे

मुंबईत बीएमसी ने रचले आहेत मृत्यूचे सापळे

*कोंकण एक्सप्रेस*

*मुंबईत बीएमसी ने रचले आहेत मृत्यूचे सापळे*

*शिरगांव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील राहणारा आणि नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेला तेजस चंद्रकांत तावडे हा 28 वर्षीय तरुण रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी रात्री 12 च्या सुमारास जेवण पार्सल घेण्यासाठी एलटी रोड,बाभई नाका, बोरिवली (w)येथील पपीज किचन या हॉटेल मध्ये गेला होता. जेवणाची ऑर्डर देऊन झाल्यावर लघुशंकेसाठी म्हणून हॉटेलच्या समोरील अंधाऱ्या भागात गेला असता तिथेच काळाने त्याच्यावर घाला घातला अगदी जमीनी लगत असलेल्या फार जुन्या विना वापराच्या विहिरीमध्ये हा तरुण पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी तसेच सामाजिक कार्यकर्ते शरद साटम यांनी त्याला हॉस्पिटल मधील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली, परंतु तो पर्यंत मात्र महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे एका कुटुंबाचा आधार असलेला तेजस मात्र निघून गेला होता. खर तर असे मुंबई त कित्येक ठिकाणी इतरत्र विहिरी, गटारे असतील त्यातही कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कुटुंबाचा आधार त्यात पडून शेवटचा श्वास घेतील अशी परिस्थिती मुंबईत बऱ्याच ठिकाणी आहे. खरंतर महानगरपालिकेवर असंख्य वर्ष ज्यांनी प्रशासन चालवले त्यांनी असे असंख्य मृत्यूचे सापळे बनलेली ठिकाणे याची माहिती घेतली नाही त्यावर उपाययोजना केल्या नाहीत. आता महानगरपालिकेच्या महापौर आणि सर्व नगरसेवक यांनी अशा ठिकाणांची माहिती घेऊन या घटनेतून बोध घेऊन अशी ठिकाणे बंद करतील आणि होणारे अपघात टाळतील हीच अपेक्षा या प्रकरणात पोलीस, हॉस्पिटल यांनी सहकार्य केले मात्र तोपर्यंत पुन्हा कधीच न येणार तेजस जगातून निघून गेला आहे. आता या घटने वरती आपण काही शोक व्यक्त केला आणि पुन्हा अशा घटना घडू नये त्यासाठी उपाययोजना केल्या तरी तेजस परत येणार नाही. हे मात्र नक्की एका गरीब कुटुंबातील कर्ता तरुण ऐन तारुण्यात कुटुंबाला सोडून गेला असल्यामुळे कुटुंबावर दुःखा चा डोंगर कोसळला आहे. यातून थोडाफार त्यांना आधार मिळावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत देऊन मदतीचा हात पुढे करावा तसेच कुटुंबातील त्याचा छोटा भाऊ याला महानगर पालिकेच्या सेवेमध्ये सामावून घेऊन तेजस या कोकणी मराठी मुलाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करावी हीच अपेक्षा.या संदर्भात स्थानिक शिरगांव येथील भाजप सरचिटणीस संदीप साटम यांनी सिंधुदुर्ग पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचेशी संपर्क साधून त्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!