*श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेच्या वतीने शिवडाव विद्यालयात गराजलो रे गराजलो चा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम*

*श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेच्या वतीने शिवडाव विद्यालयात गराजलो रे गराजलो चा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेच्या वतीने शिवडाव विद्यालयात गराजलो रे गराजलो चा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम*

*शिरगांव : संतोष साळसकर*

शिवडाव सेवा संघ,मुंबई संचलित शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे 11 मार्च रोजी श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था रजि प्रस्तुत गराजलो रे “गराजलो रे गराजलो”चा व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम उत्साहात पार पडला
या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध वक्ते सहदेव धर्णे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी सहदेव धर्णे यांनी आपल्या प्रभावी आवाजात “गराजलो रे गराजलो” या सादरीकरणातून व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर प्रबोधन करत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी आई-वडिलांचा आदर, व्यायाम, वक्तृत्व, देहबोली आणि आत्मविश्वास यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. त्यांच्या दमदार सादरीकरणाला विद्यार्थी आणि शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पवार सर, शालेय समितीचे सदस्य श्री. गणेश म्हसकर, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!