निरोगी आयुष्यासाठी खेळाचे महत्त्व; सिंधुदुर्गनगरीत जिल्हास्तरीय पत्रकार क्रिकेट स्पर्धेचा थरार!

निरोगी आयुष्यासाठी खेळाचे महत्त्व; सिंधुदुर्गनगरीत जिल्हास्तरीय पत्रकार क्रिकेट स्पर्धेचा थरार!

*कोंकण एक्सप्रेस*

*निरोगी आयुष्यासाठी खेळाचे महत्त्व; सिंधुदुर्गनगरीत जिल्हास्तरीय पत्रकार क्रिकेट स्पर्धेचा थरार!*

*सिधुदुर्ग*

सुखर जीवनासाठी निरोगी आयुष्य महत्वाचे असते. निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा असतो. हा व्यायाम मैदानावरील खेळातून मिळते. त्यामुळे नियमित खेळणे महत्वाचे आहे. त्याच उद्देशाने मुख्यालय पत्रकार संघाने आयोजित केलेल्या जिल्ह्यातील पत्रकारांसाठीच्या क्रिकेट स्पर्धा हा उपक्रम निश्चितच बोध घ्यायला लावणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानावर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी बुधवारी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, पत्रकारांचे राज्य प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा सचिव बाळ खडपकर, जिल्हा प्रतिनिधी संजय वालावलकर, राजन नाईक, मुख्यालय अध्यक्ष लवू म्हाडेश्वर, सचिव दत्तप्रसाद वालावलकर, खजिनदार गिरीश परब, कुडाळ अध्यक्ष विजय पालकर, तेजस्वी काळसेकर, सतीश हरमलकर, संदीप गावडे, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, मनोज वारंग, विनोद परब यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दहिकर यांनी, पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन हे आपण पहिल्यांदा पाहत आहोत. पत्रकार हे नेहमीच फटकेबाजी करीत असतात. परंतु आजचे सामने त्यांच्या त्यांच्यातच आहेत. त्यामुळे गुगली, चौकार, षटकार यासाठी चुरस दिसणार आहे. बॉल आणि बॅट मधील हा संघर्ष मैदानावर दिसणार आहे, असे सांगत क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी खास आपल्या शैलीत मार्मिक भाषण करताना पत्रकार आणि आपले स्नेहाचे सबंध आहेत. सुदैवाने आपण भाजपचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून झालेल्या सर्व निवडणुकांत स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. या यशात पत्रकारांच्या सहकार्याचा प्रभाव आहे, असे सांगत मुख्यालय पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. त्यांचे चांगले नियोजन असते. या वर्षी होणाऱ्या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा आहेत, असे सांगितले.

प्रशासनाने बोध घ्यावी अशी स्पर्धा: खेबुडकर
स्पर्धा सुरू झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी स्पर्धेला भेट दिली. यावेळी शुभेच्छा देताना त्यांनी पत्रकारांची ही क्रिकेट स्पर्धा प्रशासनाने बोध घ्यावी, अशी आहे. पत्रकारांना विरंगुळा मिळावा आणि त्यांच्यातील क्रिकेट खेळाला व्यासपीठ मिळावे, यासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा कौतुकास पात्र आहे, असे सांगत ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!