*कोंकण एक्सप्रेस*
*महिला काथ्या संस्थेतर्फे महिला दिन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
कॅम्प येथील औद्योगिक महिला काथ्या संस्थेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अ·िानी माईणकर यांनी उपस्थित महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपिठावर डॉ.अ·िानी माईणकर, महिला काथ्या संस्थेच्या व्यवस्थापक प्रज्ञा परब, नगरसेवक आकांक्षा परब, समिधा रेडकर, काजल कुबल, शितल आंगचेकर, लिना म्हापणकर, गौरी मराठे, गौरी माईणकर, माजी नगरसेवक प्रविणा खानोलकर व अन्य उपस्थित होते. याच मेळाव्यात महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. त्यानंतर महिलांनी उत्कृष्ट मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले.

