*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडी शहरातील डॉक्टर प्रवीण मसूरकर ,मुलगा कौस्तुभ व पत्नी कुवेत देशातून सुखरूप मुंबईत*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी तालुका व शहरातील डॉक्टर प्रवीण मसुरकर व त्याचा मुलगा कौस्तुभ व त्याची पत्नी कुवेत या अरब देशांमध्ये अचानकपणे युद्ध चालू असताना 28 फेब्रुवारी रोजी कुवेत देशामध्ये हे कुटुंब अडकले असून दहा दिवसानंतर हे कुटुंब सौदी अरब देशातून मंगळवार 10 मार्च ला सायंकाळी आपल्या मायदेशी भारत देशामध्ये मुंबईला सुखरूप पणे हे कुटुंब पोहोचले यामुळे मसुरकर कुटुंबियांमध्ये चिंतेत असल्याने ईश्वरी कृपेने त्याचप्रमाणे परमपूज्य भाऊ मसुरकर यांच्या कृपाआशीर्वादाने डॉक्टर प्रवीण मसुरकर व कुटुंब हे मायदेशी मुंबई येथे परतल्याने आनंद व्यक्त करण्यात आला आहे डॉक्टर प्रवीण मसुरकर यांना दोन मुलगे असून सौरभ मसुरकर हा मुलगा अमेरिकेमध्ये आयटी इंजिनिअर असून नोव्हेंबर 25 सालामध्ये त्याचे लग्न झाल्याने डॉक्टर प्रवीण मसुरकर यांची पत्नी डॉक्टर प्राजक्ता मसुरकर ही आपल्या मुला समवेत अमेरिकेला जानेवारी महिन्यामध्ये गेली होती त्यानंतर फेब्रुवारी 28 ला डॉक्टर प्रवीण मसुरकर व त्याचा दुसरा मुलगा पुणे येथे नोकरी करत असताना सिव्हिल इंजिनिअर कौस्तुभ मसुरकर व पत्नी असे हे कुटुंब भारत देशातून कुवेत इराण मार्गे अमेरिका असे विमान प्रवासातून आपल्या अमेरिकेतील सौरभ या मुलाकडे काही दिवसांकरता जाणार होते यातच 28 फेब्रुवारी रोजी सकाळी कुवेतला हे विमान युद्ध सुरू झाल्याने थांबवण्यात आले इराण व इजराइल अमेरिका युद्धाला त्याच दिवशी सुरुवात झाल्याने त्यांना गेले दहा दिवस कुवेत येते एअरपोर्ट पासून 40 किलोमीटर वरती हॉटेलमध्ये राहावं लागलं भीतीच्या वातावरणात अवकाशात सतत मिसाईलचा मारा तसेच शहरामध्ये काही तासात अधून मधून सायरन जागृत राहण्यासाठी आवाज येत होता त्यामध्ये सावंतवाडीतील कुवेत मध्ये राहणारे कुटुंब संपर्कात आले सावंतवाडी शहरातील उभा बाजार मध्ये राहणारे कुटुंबीय सौ प्रतिभा कारेकर तसेच आसिफ पटेल कोलगाव निरुखेवाडी सावंतवाडीतील हे कुटुंबीय रोजच्या रोज हॉटेलमध्ये येऊन डॉक्टर प्रवीण मसुरकर व त्यांच्या कुटुंबाची चौकशी करून तसेच धीर देऊन पाहुणचार सुद्धा देत असत या कुटुंबाचे मोलाचे सहकार्य डॉक्टर प्रवीण मसुरकर यांना लाभले होते कुवेत या देशातील विमानतळाची धावपट्टी इराण या देशाने उध्वस्त केल्याने परत माय देशी परत येण्याचे अडचणीचे झाले होते यानंतर सोमवारी 9 मार्च रोजी सौदी अरेबिया या देशाची विजा डॉक्टर प्रवीण मसुरकर व त्यांच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर कुवेत मार्गे बसणे सौदी अरेबिया या देशामध्ये पोचले त्यानंतर सौदी अरेबियातून डॉक्टर प्रवीण मसुरकर व त्यांचे कुटुंब मंगळवार 10
मार्च रोजी दुपारी विमान सुटून सायंकाळी हे आपल्या मायदेशी भारत देशामध्ये मुंबईला सुखरूपपणे पोचले आहे यामुळे अनेक भारतातील नागरिक. अरब देशांमध्ये अडकले असून त्यांना सुद्धा सुखरूपपणे आपल्या मायदेशी परत यावे अशी प्रार्थना ईश्वरचरणी मसूरकर कुटुंबियाकडून करण्यात आले आहे

