उन्नती महिला मंडळ रानबांबुळी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

उन्नती महिला मंडळ रानबांबुळी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*उन्नती महिला मंडळ रानबांबुळी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन*

*सिधुदुर्गनगरी*

महिलांना समान संधी दिल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत समाजाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावतात. रानबांबुळी गावात महिलांना संधी मिळत असल्यामुळे त्या विविध क्षेत्रात पुढे येत आहेत, असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रानबांबुळी येथील महिला दीन निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
उन्नती महिला मंडळ रानबांबुळी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला न्यायाधीश रसिका निकुंभ, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, पंचायत समिती सदस्य अमित भोगले, सरपंच परशुराम परब, सजय लाड, उपसरपंच अंजली कदम, मुक्ता भोगले, उन्नती महिला मंडळ अध्यक्षा लतिका परब,अशोक परब, बबनकाका परब, डॉ वैभव आईर आदी उपस्थित होते.
गेली दहा वर्षे हा सोहळा गावात उत्साहात साजरा केला जात असून या उत्साहात महिला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आहेत. रानबांबुळी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत २५ हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक केसर वानवडेकर, द्वितीय विजया खांदारे तर तृतीय क्रमांक गार्गी सावंत यांनी पटकावला.
१ मार्च रोजी आयोजित क्रिकेट स्पर्धेत गोरोबा क्रिकेट संघ प्रथम विजेता ठरला, तर स्वप्नपूर्ती क्रिकेट संघ रानबांबुळी उपविजेता ठरला. होम मिनिस्टर व क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या महिलाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी आरती देसाई म्हणाल्या की, महिलांनी देशाचे रक्षण करण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. महिलांना संधी उपलब्ध करून दिल्यास समाजाची उन्नती होऊ शकते. जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी महिलांना आदर मिळणारे गाव विकासात कधीही मागे राहत नसल्याचे सांगितले.
सरपंच परशुराम परब यांनी रानबांबुळी गावातील बहुतांश समस्या मार्गी लागल्याचे सांगितले. कचरा टाकणाऱ्यांचे फोटो देणाऱ्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
कार्यक्रमात रसिका निकुंब यांनीही मनोगत व्यक्त केले. ७० वर्षीय महिलाही उत्साहाने कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन सौ दिया जाधव वा सौ गीतांजली जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उन्नती महिला मंडळ च्या सर्व महिला, गावातील बचत गटातील सर्व महिला व ग्रामस्थ यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!