*कोंकण एक्सप्रेस*
*महिला दिनानिमित्त चाफेड दुर्गावर स्वच्छता मोहीम*
*मावळे आम्ही स्वराज्याचे कणकवली विभाग मार्फत राबवली मोहीम*
*शिरगांव : संतोष साळसकर*
मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य , या संघटनेच्या कणकवली विभाग अंतर्गत दिनांक 8 मे रोजी महिला दिना निमित्त चाफेड दुर्गाचा गड येथे स्वच्छता मोहीम आणि चाफेड दुर्गाचा महादरवाचा मोकळा कारणाची मोहीम राबवण्यात आली.
आता पर्यंत मावळे आम्ही स्वराज्याचे कणकवली विभाग यांच्या अंतर्गत मागच्या दीड वर्षापासून चाफेड दुर्गाच्या गडावर खचलेला महादरवाच्या मोकळा करण्याचे कार्य सुरू आहे . महादरवाजाचे 50% कार्य पूर्ण झाले असून येत्या 2026 मध्ये उर्वरित कार्य पूर्ण करून पर्यटन आणि शिवप्रेमी साठी चाफेड दुर्गाचा महादरवाजा पूर्णपणे मोकळा करून सर्वांसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष अनिकेत अनंत तर्फे यांनी दिली आहे.
काल झालेल्या मोहिमेमध्ये महिला दिनानिमित्त किल्ल्यावर उपस्थित असलेल्या सर्व महिलांचे पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष अनंत आचरेकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या मोहिमेमध्ये चाफेड गावचे सरपंच महेश राणे यांचं मार्गदर्शन लाभले तसेच शिवप्रतिष्ठान कोळोशी रणरागिणी विभाग खजिनदार सानिका इंदप या देखील उपस्थित होत्या. सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अनंत आचरेकर, उपजिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे, माहिती अधिकारी नील आचारेकर, सल्लागार अर्जुन जाधव , मीडिया प्रमुख रसिका चव्हाण, शुभम रांबाडे, सारिका तोरसकर, साक्षी जाधव , उपस्थित होते .

