*कोंकण एक्सप्रेस*
*ओंकारेश्वर दत्त मंदिरात 12 रोजी गणेशयागाचे आयोजन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला बाजारपेठ नजिकच्या श्री कैवल्यस्वामी ओंकारेश्वर दत्त मंदिर येथे गुरूवार दि.12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पुणे अग्निहोत्र मंडळातर्फे श्री गणेशयाग आयोजित केला आहे.
याचदिवशी संपूर्ण दिवस अग्निहोत्र प्रचार तर सायंकाळी 6.42 वाजता अग्निहोत्र प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. तरी भाविकांनी या गणेशयागात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9423832848, 7588448718 किंवा 9822485523 यावर संपर्क साधावा.

