वेंगुर्ला शाळा नं.1 मध्ये महिला दिन उत्साहात

वेंगुर्ला शाळा नं.1 मध्ये महिला दिन उत्साहात

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला शाळा नं.1 मध्ये महिला दिन उत्साहात*

*वेंगुर्ला प्रतिनिधी(प्रथमेश गुरव)*
वेंगुर्ला शाळा नं.1 मध्ये रविवारी मार्गदर्शन व्याख्यान, विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान, फनिगेम्स आदी कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. शाळेतील बहुसंख्य महिला पालकांनी उपस्थित रहात या कार्यक्रमांचा आनंद लुटला.
शासनाच्या परिपत्रकानुसार महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला शाळा नं.1च्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 8 मार्च रोजी सायंकाळी शाळेच्या “विठाई’ सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हापरिषद आरोग्य विभागाच्या अधिकारी समृद्धी परब आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सेजल रजपूत, सदस्य इंद्रायणी पडवळ, पूजा भगत, प्रा.शिंदे,चैताली कामत, साची वेंगुर्लेकर, रश्मी गावडे, रेखा नाईक आणि प्रभारी मुख्याध्यापक लिना नाईक उपस्थित होते.
डॉ. अश्विनी माईणकर यांनी सध्याच्या काळात स्त्रियांच्या आरोग्य विषयक अनास्थेमुळे उद्भवणा-या आजारांची जाणिव करून दिली. तर समृद्धी परब यांनी आपली आई ही संपूर्ण कुटुंबाचा आधार कसा बनते यावर प्रकाश टाकला. त्यानंतर महिला पोलिस कर्मचारी पूजा पालयेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर, आरोग्य विभागाच्या समृद्धी परब, नगरसेवक रिया केरकर, महसूल कर्मचारी साक्षी वेंगुर्लेकर, कु. चाहत शुक्ला, एस.टी.महामंडळाच्या कर्मचारी सेजल रजपूत यांचा शाळेच्यावतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित महिलांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्यांनाही विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलान संध्या नंदगिरकर यांनी तर आभार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साक्षी वेंगुर्लेकर, सेजल रजपूत, चैताली कामत, इंद्रायणी पडवळ, वर्षा गिरप, रेखा नाईक यांच्यासह मिलिंद वाव्हळे, प्रशांत मांडे, प्रगती आव्हाड यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!