*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडी पं. स. सभापतीपदी सिद्धेश रावराणे तर उपसभापती साची कोलते यांची निवड*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
वैभववाडी पं. स. च्या सभापतीपदी सिद्धेश दिलीप रावराणे आणि उपसभापती पदी
साची कोलते यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींकडून पसंती देण्यात आली आहे. वैभववाडी पं. स. मध्ये सर्व सहाही सदस्य भाजपाचे आहेत. सिद्धेश रावराणे आणि साची कोलते यांनी सभापती आणि उपसभापती पदासाठी नामनिर्देशन दाखल केले असून दुपारी साडेतीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सूर्यकांत पाटील सभापती उपसभापती निवडीची अधिकृत घोषणा करतील.

