*कोंकण एक्सप्रेस*
*नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त समिती (रजि.) च्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*
*फोंडाघाट : प्रतिनिधी*
नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने गावातील नागरिकांसाठी रविवार दिनांक ८/०३/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय, कणकवली यांच्या सहकार्याने श्री. संतोष मोतीराम तेली यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये मोतीबिंदू, काचबिंदू तपासणी, मशिनद्वारे चष्मा नंबर तपासणी (Autoref), पडदा (Retina) तपासणी तसेच OCT स्क्रिनिंग आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. गरजूंना पुढील उपचार व शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
गावातील सर्व नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

