मालवणच्या समुद्रात एकाचवेळी बहुसंख्य डॉल्फिनचे दर्शन..

मालवणच्या समुद्रात एकाचवेळी बहुसंख्य डॉल्फिनचे दर्शन..

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवणच्या समुद्रात एकाचवेळी बहुसंख्य डॉल्फिनचे दर्शन…*

*मालवण ः प्रतिनिधी*

डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवणच्या समुद्रात एकाच वेळी ७० ते ७५ डॉल्फिनचे दर्शन झाल्याचे अनोखे दृश्य सागरी जीव अभ्यासक विशाल भावे यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात टिपले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने डॉल्फिन मासे एकत्रित समुद्रात विहार करताना प्रथमच दिसून आले आहेत.

मालवणसह तारकर्ली, देवबाग पर्यंतच्या समुद्रात डॉल्फिन माशांचे दर्शन होत असते. हे डॉल्फिन पर्यटकांचेही आकर्षण असून समुद्र नौका विहाराच्या माध्यमातून मोठ्या संख्येने पर्यटक खास डॉल्फिन दर्शनासाठी जातात. मात्र यावेळी दिसणारे डॉल्फिन हे मोजकेच दिसून येतात. या पार्श्वभूमीवर मालवण समुद्रात एकाच वेळी ७० ते ७५ डॉल्फीनचे दर्शन झाले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने डॉल्फीन एकत्रीत समुद्रात फिरताना पहिल्यांदाच दिसून आले आहेत. इंडियन ओशन हम्पबँक डॉल्फीन हे प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सागरी परिक्षेत्रात आढळून येतात. हे डॉल्फीन कळपाने राहतात, मालवण समुद्रात एकत्रीत फिरताना या डॉल्फीनचे विहंगम दृश्य सागरी जीव अभ्यासक विशाल भावे यांनी ड्रोन कॅमेऱ्यात कैद केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित आलेले डॉल्फिन समुद्रप्रेमी तसेच प्राणी व निसर्गप्रेमींसाठी कुतूहलचा व अभ्यासाचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!