*सोमवतीनिमित्त उपवडेच्या ग्रामदेवतेचे सागरे·ार किनारी तीर्थस्नान*

*सोमवतीनिमित्त उपवडेच्या ग्रामदेवतेचे सागरे·ार किनारी तीर्थस्नान*

*कोंकण एक्सप्रेस*

*सोमवतीनिमित्त उपवडेच्या ग्रामदेवतेचे सागरे·ार किनारी तीर्थस्नान*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

सोमवती अमावास्येनिमित्त कुडाळ तालुक्यातील उपवडे गावची ग्रामदेवता आणि तरंगदेवतांनी आपल्या भक्तांसह वेंगुर्ला येथील सागरे·ार किनारी तीर्थस्नान केले.
सोमवारी अमावास्या आल्याने तीर्थस्नान करण्यासाठी उपवडे गावची श्री पावणाई-रवळनाथ आदी ग्रामदैवत पालखीसह तसेच श्री रवळनाथ, श्री भूतनाथ आणि श्री पावणाई आदी तरंगदेवता यांचे वेंगुर्ला येथे आगमन झाले आहे. वेंगुर्ला शहरात प्रवेश केल्यानंतर या देवस्वारीने प्रारंभी श्री देवी सातेरीची भेट घेतली.  त्यानंतर श्री देव रामे·ाराची भेट घेत श्री क्षेत्र सागरे·ार किनारी जात तेथे तीर्थस्नान केले. यावेळी उपवडे गावातील बहुसंख्य भाविकांनीही या तीर्थस्नानाचा लाभ घेतला. या तीर्थस्नानानंतर ही देवस्वारी आपल्या भक्तांसह सातेरी मंदिरात मुक्कामाला थांबली असून मंगळवारी सकाळी आपल्या गावी निघणार आहे. दरम्यान, वेंगुल्र्यातील नागरिकांनी या देवतांचे दर्शन घेत नारळ, केळी, ओटी अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!