*कोंकण एक्सप्रेस*
*शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न; परीक्षा काळात अखंड वीजपुरवठ्याची मागणी*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी ठाकरे सेना जिल्हाध्यक्ष बाबूराव धुरी यांनी केली आहे.
आर्थिक वर्षाच्या कारणावरून थकीत बिल असल्यास ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी वर केला आहे. परीक्षा काळात वीज खंडित झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा बंद करू नये, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
ही मागणी दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांनीही समर्थन केली आहे.

