तेरवण पेंढरेवाडी ग्रामविकासाला चालना; पत्रा शेडचे भूमीपूजन उत्साहात

तेरवण पेंढरेवाडी ग्रामविकासाला चालना; पत्रा शेडचे भूमीपूजन उत्साहात

*कोंकण एक्सप्रेस*

*तेरवण पेंढरेवाडी ग्रामविकासाला चालना; पत्रा शेडचे भूमीपूजन उत्साहात*

*दोडामार्ग : शुभम गवस*

तेरवण पेंढरेवाडी येथील पत्रा शेड बांधकामासाठी स्थानिक आमदार तथा माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामाचे भूमीपूजन ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
दोडामार्ग तालुक्यातील डोंगराळ भागातील हे शेवटचे गाव असून, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर या गावाच्या विकासाला सुरुवात आमदार केसरकर यांनी केली. गावात दोन स्मशानभूमी, सभागृह, पत्रा शेड, नवीन शाळेसाठी वर्गखोली तसेच तेरवण–मढे रस्ता अशी विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत.
या कामांबद्दल ग्रामस्थांनी आमदार दिपकभाई केसरकर व तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांचे आभार मानले. तेरवण पेंढरेवाडी येथे होणाऱ्या वार्षिक सत्यनारायण पूजेच्या दिवशी या कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून, त्या वेळी आमदार केसरकर, गणेशप्रसाद गवस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.
ही माहिती विजय खेमाजी गवस, शिवसेना पदाधिकारी शिवसेना यांनी दिली.
भूमीपूजन प्रसंगी चंद्रकांत गवस, उमाकांत गवस, गोपाळ गवस, रामा गवस, विश्राम चव्हाण, तुकाराम गवस, गणपत गवस, लाडू गवस, बाळा गवस, गौरव गवस तसेच गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!