जिव्हाळा सेवाश्रमाचे ‘गौरव पुरस्कार’ जाहीर

जिव्हाळा सेवाश्रमाचे ‘गौरव पुरस्कार’ जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*जिव्हाळा सेवाश्रमाचे ‘गौरव पुरस्कार’ जाहीर…*

*१४ फेब्रुवारीला पुरस्कार वितरण सोहळा..*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमच्या वतीने गेली दहा वर्षे वृद्धांची मनोभावे सेवा केली जात असून, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा मान्यवरांना ‘जिव्हाळा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जिव्हाळा सेवाश्रम, म्हाडयाचीवाडी-रायवाडी येथे संपन्न होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुरेश उर्फ दादा बिर्जे यांनी दिली.

यावेळी बोलताना श्री. बिर्जे म्हणाले की, जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून गेली दहा वर्षे वृद्धाश्रमातील सेवाकार्य सातत्याने सुरू आहे. सध्या सेवाश्रमात २५ वृद्ध लाभार्थी असून, त्यांच्या संगोपन व सेवेसाठी संस्था कटिबद्ध आहे. सेवाश्रमाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता चि. अन्वेष बिर्जे यांच्या वाढदिवसानिमित्त लाभार्थ्यांना फळवाटप करण्यात येईल. सकाळी ११.३० वाजता आरोग्य उपक्रमांतर्गत फिजिओथेरपी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २ वाजता स्नेहभोजन तर दुपारी ३ वाजता मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गौरवमूर्तीना ‘जिव्हाळा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षी अभिनेत्री सौ. श्रद्धा खानोलकर, पत्रकार अजय सावंत, शिक्षक माणिक पवार, केदार देसाई, वैशाली देसाई, प्रसाद परब, रवी कुडाळकर, उदय आईर, नितेश तांबे, साक्षी शेल्टे आदी कला, क्रीडा, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व अॅड अनिल बर्वे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, माडयाचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, उपसरपंच अस्मिता गावडे, माजी सरपंच सचिन गावडे, गोव्याचे उद्योजक सुरेश मोरजकर, संतोष शेटगावकर, मोहन आरावंदेकर, रामकृष्ण सामंत, पीटीओ प्रशांत केरवडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ४ वाजता योगेश प्रभू व आनंद मोर्ये यांचा सुगम संगीत कार्यक्रम होणार असून सायंकाळी ६ वाजता वाढदिवस सोहळ्याची सांगता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!