*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ-घावनळे मतदारसंघात शिवसेनेचा भगवा; दीपक नारकर यांचा दणदणीत विजय*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक २०२६ चा बिगुल वाजल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ-घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री. केशव उर्फ दीपक नारकर यांनी प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड देत भव्य विजय संपादन केला.
विजयाचा गुलाल आणि जल्लोष
निकाल जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी कुडाळ शहरासह घावनळे परिसरात एकच जल्लोष केला. “दीपक नारकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विजयानंतर दीपक नारकर यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन मतदारांचे आभार मानले.

