कोनाळ मतदारसंघात ‘छत्री’चा पाऊस – साक्षी देसाईंच्या प्रचाराला वेग

कोनाळ मतदारसंघात ‘छत्री’चा पाऊस – साक्षी देसाईंच्या प्रचाराला वेग

*कोंकण एक्सप्रेस*

*कोनाळ मतदारसंघात ‘छत्री’चा पाऊस – साक्षी देसाईंच्या प्रचाराला वेग*

*दोडामार्ग : शुभम गवस*

कोनाळ मतदारसंघात अपक्ष उमेदवार सौं. साक्षी संदिप देसाई यांच्या प्रचाराला सध्या चांगलाच वेग आला असून त्यांच्या निवडणूक चिन्ह असलेल्या ‘छत्री’चा पाऊस मतदारसंघात पाहायला मिळत आहे. देसाई यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी घरोघरी जाऊन ‘छत्री’ चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम उत्साहात सुरू केले आहे.
सौं. साक्षी देसाई यांनी केलेल्या जनसंपर्क मोहिमेमुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असून त्यांच्या प्रचाराला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलावर्ग, युवा वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत असून, ‘छत्री’ हे चिन्ह मतदारसंघात चर्चेचा विषय बनत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!