“आपलीच लेक, आपलीच सुन” म्हणत साक्षी देसाईंना जनतेचा भरभरून प्रतिसाद

“आपलीच लेक, आपलीच सुन” म्हणत साक्षी देसाईंना जनतेचा भरभरून प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*“आपलीच लेक, आपलीच सुन” म्हणत साक्षी देसाईंना जनतेचा भरभरून प्रतिसाद*

*दोडामार्ग: शुभम गवस*

प्रभावी नेतृत्व गुण आणि संयमी भाषा शैलीच्या जोरावर आपल्या विकासकामांमुळे केवळ गावातच नव्हे तर दोडामार्ग तालुक्यातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सौं. साक्षी देसाई सध्या कोनाळ मतदार संघात घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. त्यांच्या समाजकार्यामुळे त्या गावागावात परिचित झाल्या असून प्रचारादरम्यान त्यांना नवख्या उमेदवारासारखा प्रतिसाद न मिळता, लोक आपल्या घरातील सुनबाई म्हणून त्यांच्यावर आशीर्वादाचा कौल देताना दिसत आहेत.
सौं. साक्षी देसाई यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असल्यामुळे कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा, याची त्यांना चांगली जाण आहे. त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या असल्या, तरी त्यांच्या पाठिशी उभा असलेला जनतेचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रभावी महिला नेतृत्व आणि संयमी स्वभावामुळे सौं. साक्षी देसाई यांची गावपातळीवर चांगलीच चर्चा रंगत असून कोनाळ मतदार संघात त्यांचे पारडे जड राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!