मणेरीत मशाल पेटली, ठाकरे सेनेची चाल जुळली; प्रिती धुरी रणांगणात उतरली

मणेरीत मशाल पेटली, ठाकरे सेनेची चाल जुळली; प्रिती धुरी रणांगणात उतरली

*कोंकण एक्सप्रेस*

*मणेरीत मशाल पेटली, ठाकरे सेनेची चाल जुळली; प्रिती धुरी रणांगणात उतरली*

*दोडामार्ग: शुभम गवस*

मणेरी पंचायत समिती मतदारसंघातून ठाकरे गटाच्या शिवसेनेने अचूक राजकीय डाव साधत सौ. प्रिती बाबुराव धुरी यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. पक्षाच्या “मशाल” चिन्हाला बळ देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे मणेरी मतदारसंघातील राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे.
सौ. प्रिती धुरी या शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या सौभाग्यवती असून, त्या एक संयमी, सुसंस्कृत व सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळणारा परिचित चेहरा म्हणून ओळखल्या जातात. गावोगावी असलेली त्यांची ओळख आणि सातत्याने टिकवलेला जनसंपर्क हा त्यांच्या प्रचाराचा मोठा आधार मानला जात आहे.
स्थानिक प्रश्नांची जाण, महिलांबाबतची आपुलकी आणि सामाजिक प्रश्नांवरील सकारात्मक भूमिका यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी उत्सुकता वाढताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या या निर्णयामुळे मणेरी पंचायत समिती मतदारसंघात निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!