कोनाळच्या राजकीय पटावर बदलाची छाप..साक्षी देसाई अपक्ष उमेदवार..!

कोनाळच्या राजकीय पटावर बदलाची छाप..साक्षी देसाई अपक्ष उमेदवार..!

*कोंकण एक्सप्रेस*

*कोनाळच्या राजकीय पटावर बदलाची छाप..साक्षी देसाई अपक्ष उमेदवार..!*

*दोडामार्ग: शुभम गवस*

जिल्हा परिषद व पंचायत समिती दोडामार्ग सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती कोनाळ मतदारसंघातून सौ. साक्षी संदीप देसाई यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे कोनाळ मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या हालचालींना सुरुवात झाली आहे.
निवडणूक आयोगाकडून त्यांना “छत्री” हे निवडणूक चिन्ह अधिकृतपणे मंजूर झाले असून, त्या अनुषंगाने त्यांनी मतदारसंघात व्यापक जनसंपर्क सुरू केला आहे. गावोगावी भेटीगाठी, नागरिकांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांचे आकलन करण्यावर त्यांनी भर दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, कोनाळ मतदारसंघात निवडणुकीची चुरस वाढत असून, अपक्ष उमेदवार म्हणून सौ. साक्षी संदीप देसाई यांच्या भूमिकेकडे मतदारांचे लक्ष वेधले जात आहे. आगामी निवडणूक प्रक्रियेत त्यांची वाटचाल कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!