*कोंकण एक्सप्रेस*
*कौटुंबिक दुर्दैवी घटनेमुळे चेतना गडेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे*
*दोडामार्ग : शुभम गवस*
चेतना चित्रसेन गडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज कुटुंबातील दुर्दैवी घटनेमुळे मागे घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कुटुंबातील सर्वांच्या जिवाभावाचा छोटा दीर अकाली निघून गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून, या परिस्थितीत निवडणूक प्रक्रियेत सक्रिय राहणे शक्य नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे कोणताही राजकीय दबाव, मतभेद अथवा इतर गैरसमज नसून, हा पूर्णतः वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव घेतलेला निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी याबाबत कोणताही संभ्रम ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

