कोनाळमध्ये महायुतीचे वारे; नितेश राणे व दीपक केसरकरांच्या दौऱ्याने उत्साह वाढला..

कोनाळमध्ये महायुतीचे वारे; नितेश राणे व दीपक केसरकरांच्या दौऱ्याने उत्साह वाढला..

*कोंकण एक्सप्रेस*

*कोनाळमध्ये महायुतीचे वारे; नितेश राणे व दीपक केसरकरांच्या दौऱ्याने उत्साह वाढला…*

*दोडामार्ग : शुभम गवस*

आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोनाळ पंचायत समिती मतदारसंघात महायुतीने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. सायली स्वप्निल निंबाळकर यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर यांचे दोडामार्ग येथे जंगी व उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
या स्वागतप्रसंगी महायुतीचे तालुका व जिल्हा पदाधिकारी, विविध आघाडीचे प्रमुख, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात व घोषणाबाजीसह झालेल्या या स्वागतामुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिक तापले असून महायुतीच्या प्रचाराला नवे बळ मिळाले आहे.
यावेळी झालेल्या बैठकीत कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच महिला व युवक सक्षमीकरण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच महायुतीचा केंद्रबिंदू असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “राज्य शासनाच्या माध्यमातून कोनाळसह दोडामार्ग तालुक्यात विकासकामांसाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. विकासासाठी कटिबद्ध असलेल्या उमेदवारांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहील.”
माजी शिक्षण मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांनीही महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनात्मक ताकद, जनतेशी थेट संपर्क आणि विकासाभिमुख राजकारणावर भर दिला. “जनतेचा विश्वास जिंकणारे नेतृत्व म्हणजेच खरे नेतृत्व,” असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी उमेदवार सौ. सायली स्वप्निल निंबाळकर यांनी मतदारसंघातील नागरिकांचे आभार मानत, “जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाज करण्याचा माझा संकल्प आहे. महायुतीच्या माध्यमातून कोनाळ पंचायत समितीच्या विकासाचा नवा अध्याय सुरू केला जाईल,” अशी ग्वाही दिली.
या दौऱ्यामुळे कोनाळ पंचायत समिती मतदारसंघात महायुतीचे वारे अधिकच अनुकूल होत असून, आगामी निवडणुकीत महायुती निर्णायक विजय मिळवेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!