माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

*कोंकण एक्सप्रेस*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

*कणकवली ः संजना हळदिवे*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशालेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला*.

*या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा.श्री. सतीशजी सावंत (अध्यक्ष,क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई) यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रगीत, झेंडागीत, राज्यगीत, संविधान, ध्वज शपथ, कॉफी मुक्त अभियान शपथ, साक्षरता शपथ, NCC, MCC, स्काऊट गाईड विद्यार्थ्यांची मानवंदना देण्यात आली. बालमंदिर विभाग तसेच माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सुरेख रंगीत कवायती, विद्यार्थी मनोगते, गीत गायन, संविधान जागृती पथनाट्य सादरीकरण केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सन्मा. सतीश सावंत यांनी विद्यार्थ्यांना शुभसंदेश व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सरते शेवटी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी यांच्यात मित्रत्वाचे कबड्डी सामने खेळवण्यात आले.*

*सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती संस्थेचे सरचिटणीस सन्मा. श्री. शिवाजी सावंत, श्री.नागेश सावंत, श्री.व्ही.बी. सावंत, आदी मान्यवर तसेच शालेय समिती चेअरमन मा.श्री.आर.एच.सावंत, शालेय समिती सदस्य श्री. गणपत सावंत,श्री.चंद्रशेखर वाळके,श्री. संतोष सावंत, श्री. बावतीस घोन्सालवीस, श्री. मंगेश सावंत, श्री. नितीन सावंत, श्री. सुनिल सावंत, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य लोबो सर, माजी वरिष्ठ लिपिक श्री.प्रमोद सावंत सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समितीचे सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी,पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्री. प्रसाद मसुरकर यांनी केले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!