कणकवलीत आज रंगणार चिमुकल्यांसाठी ‘खाऊगल्ली’; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार शुभारंभ

कणकवलीत आज रंगणार चिमुकल्यांसाठी ‘खाऊगल्ली’; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत आज रंगणार चिमुकल्यांसाठी ‘खाऊगल्ली’; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार शुभारंभ†

*समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन; ‘खाणे आणि गाणे’ची मेजवानी अन् ‘किलबिल जल्लोष’चा उत्साह*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली शहरातील चिमुकल्यांना विरंगुळा आणि आनंदाची पर्वणी देण्यासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आज, २४ जानेवारी रोजी ‘खाऊगल्ली’ आणि ‘किलबिल जल्लोष’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी ५:३० वाजता चौंडेश्वरी मंदिरानजीक, गणपती साना येथे होणार आहे.
काय असेल खास आकर्षण?
• खाणे आणि गाणे: कार्यक्रमाची हीच मुख्य टॅगलाईन असून, लहान मुलांसाठी मुंबईतील नामवंत गायकांचा ‘किलबिल जल्लोष’ हा संगीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
• मोफत खाऊ कूपन: सहभागी होणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला खाऊसाठी एक मोफत कूपन दिले जाणार आहे.
• विविध स्टॉल्स: पिझ्झा, पाणीपुरी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, शावरमा आणि चायनीज अशा अनेक पदार्थांचे स्टॉल्स या खाऊगल्लीत सजणार आहेत.
• मनोरंजनाचे खेळ: मुलांच्या आवडीचे कार्टून कॅरेक्टर्स, झोपाळे, पाळणे आणि विविध खेळणी या ठिकाणी उपलब्ध असतील.
स्थानिक बचत गटांना प्राधान्य
या उपक्रमांतर्गत खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक विक्रेते आणि महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात आले असून, त्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
लहान मुलांना दैनंदिन अभ्यासातून थोडा विरंगुळा मिळावा आणि त्यांनी मज्जा-मस्ती करावी, या उद्देशाने या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कणकवलीतील जास्तीत जास्त मुलांनी आणि पालकांनी या ‘खाऊगल्ली’चा आनंद घ्यावा, असे आवाहन समीर नलावडे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!