जागृती मंडळामुळेच वेंगुर्ल्याची क्रीडा-सांस्कृतिक चळवळ समृद्ध – नगरसेवक रवींद्र शिरसाट

जागृती मंडळामुळेच वेंगुर्ल्याची क्रीडा-सांस्कृतिक चळवळ समृद्ध – नगरसेवक रवींद्र शिरसाट

*कोंकण एक्सप्रेस*

*जागृती मंडळामुळेच वेंगुर्ल्याची क्रीडा-सांस्कृतिक चळवळ समृद्ध – नगरसेवक रवींद्र शिरसाट*

*३७ व्या जागृती क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

जागृती मंडळाने नेहमीच लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम सुरू ठेऊन एक फार मोठी कला क्रीडा सांस्कृतिक चळवळ उभी केली आहे. गेली ४० वर्षे है मंडळ वेंगुर्ल्यात सक्रिय आहे. अनेकजण जागृतीच्या व्यासपीठावरूनच मोठे होऊन विविध हुद्द्यावर कार्यरत आहेत. जागृतीसारख्या मंडळांमुळेचवेंगुर्ल्यातील सांस्कृतिक व क्रीडा विश्व समृद्ध आहे, असे प्रतिपादन नगरसेवक रवींद्र शिरसाट यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केले
येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जागृती कला-क्रीडा-सांस्कृतिक मंडळाच्या ३७ व्या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जागृती मंडळाचे सल्लागार अरविंद चव्हाण, अध्यक्ष दिलीप मालवणकर, नगरसेवक प्रीतम सावंत, गौरी माईणकर, काजल कुबल, रिया केरकर, लीना म्हापणकर, समिधा रेडकर, आकांक्षा परब, जागृती मंडळाचे सचिव अमोल सावंत, सांस्कृतिक प्रमुख विवेक राणे, स्पर्धा प्रमुख एश्वर्या मालवणकर, इशा मालवणकर, मंडळाचे कार्यकर्ते शशिकांत परब, अमृत काणेकर, संजय पाटील, विश्वास पवार, चैताली पवार, भूषण मालवणकर, प्रतीक मालवणकर, प्रशांत मालवणकर, शेखर साळगावकर, संजिवनी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने झाले, उद्घाटनानंतर नगरसेविका रिया केरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या आपणही अगदी लहान असल्यापासून जागृती मंडळाशी जोडलेली आहे. उभादांडा गावातील असल्याने शालेय व महाविद्यालयीन जीवनातही जागृती मंडळाच्या विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतला आहे. या मंडळाच्या व्यासपीठामुळे आपल्याला लहानपणीच स्टेज डेअरिंग दिले, आत्मविश्वासाने उभे राहण्याची ताकद दिली. लहान मुलांच्या सर्वकश विकासासाठी झटणारे मंडळ म्हणून जागृती मंडळाचा उल्लेख सर्वात आधी करणे रास्त आहे, असे त्या म्हणाल्या.
पाहुण्याचे स्वागत जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन काका सावंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!