ओसरगाव टोल नाक्यावर भीषण अपघात..

ओसरगाव टोल नाक्यावर भीषण अपघात..

*कोंकण एक्सप्रेस*

*ओसरगाव टोल नाक्यावर भीषण अपघात..*

*दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर चालकाची सुखरूप सुटका*

*ओसरगाव : बबली राणे* 

मिनीबसची उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक झाल्यानंतर चालकाचे पाय वाहनात अडकले होते. दीड तास शर्थीचे प्रयत्न करून चालकाचे प्राण वाचवत त्याचे पाय सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

या मदतकार्यात अक्षय राणे, उदय शिर्के, बबली राणे, संजय हिरलेकर, राजन देसाई, साहिल शंकरदास, वाहतूक पोलीस झोरे साहेब तसेच टोल नाक्यावर उपस्थित नागरिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

चालकाला सुरक्षित बाहेर काढून पुढील उपचारासाठी ओरोस हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी वाचले चालकाचे प्राण!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!