*कोंकण एक्सप्रेस*
*सेवाभावाची दखल : तरुण भारतकडून सानिका तुळसकर यांचा गौरव*
*सावंतवाडी : शुभम गवस*
तरुण भारत या अग्रगण्य मराठी दैनिकाच्या सिंधुदुर्ग आवृत्तीचा ४२ वा वर्धापन दिन सावंतवाडी येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमात सीताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांच्या आरोग्य क्षेत्रातील दीर्घकालीन आणि निष्ठावान सेवेची दखल घेत त्यांचा तरुण भारतच्या मंचावर गौरव करण्यात आला.
सानिका तुळसकर या गेल्या अनेक वर्षांपासून सीताराम संजीवनी आश्रमामध्ये रुग्णसेवेत कार्यरत असून त्यांनी रुग्णांची काळजी, उपचारांतील शिस्त, तसेच सेवाभावी वृत्तीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना आधार दिला आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली असून आश्रमाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे.
आरोग्य क्षेत्रात मूकपणे, निस्वार्थ भावनेने केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, वाचक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

