कणकवली नगरपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्सहात साजरी.

कणकवली नगरपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्सहात साजरी.

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली नगरपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्सहात साजरी….*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली नगरपंचायत, महिला बालकल्याण विभाग, DAYNULM, कनकसिंधु शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला बचत गट मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. तसेच उपस्थित महिलासाठी “मी सावित्रीबाई बोलते” हे एकपात्री सादरीकरण व शहरातील बचत गट चळवलीत सक्रिय असलेल्या 6 वस्तीस्तर संघ यांचे अध्यक्ष व सचिव यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष मा. श्री. संदेशजी पारकर, नगरसेवक श्री. सुशांत नाईक, संकेत नाईक, जयेश धुमाळे, नगरसेविका सौ. सुमेधा अंधारी, सौ. जाई मुरकर, सौ.दीपिका जाधव, कनकसिंधु शहर स्तर संघ अध्यक्षा सौ. प्रिया सरूडकर, मार्गदर्शक सौ. प्रा. डॉ. सीमा हडकर, एकपात्री सादरीकरणकर्थी कु. आर्या कदम, सुदीप कांबळे, किशोर कदम, नगर पंचायत प्रशासकीय अधिकारी श्री. अमोल अघम, मनोज धुमाळे, अमोल भोगले, जयश्री ठाकरे, शहर स्तर संघ व वस्ती स्तर संघ कार्यकारणी पदाधिकारी तसेच मोठया संख्येने महिला बचत गट सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमांची सुरवात मा. नगराध्यक्ष व मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वल व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून करण्यात आली आलं. यानंतर सखी वस्ती स्तर संघ यांच्या कडून सावित्रीबाई यांचे एक गीत सादर करण्यात आलं तर जिजाई वस्ती स्तर संघ यांनी कविता सादर केली.
यानंतर कु. आर्या कदम हिने मी सावित्रीबाई फुले बोलते हे सादरीकरनाद्वारे पूर्वीची आणि आतची सामाजिक स्थिती व महिलांचे स्थान यावर भाष्य केल. प्रा. डॉ. सीमा हडकर यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य, त्यांच लेखन साहित्य यावर मार्गदर्शन केल. सुदीप कांबळे यांनी सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले यांच्या कार्या विषयी उपस्थित महिला सोबत चर्चा केली.
नगर पंचायत क्षेत्रात बचत गट चळवलं अंतिम घटका पर्यत नेऊन त्यांना यात सामावून घेणे व सक्रिय ठेवणे यात महत्वाच दुवा म्हणून काम करणाऱ्या वस्ती स्तर संघ यांच्या अध्यक्ष व सचिव यांचा प्रातिनिधिक स्वरूपात शाल व गुलाब देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शन करतात मा. नगराध्यक्ष म्हणाले कि महिला बचतगटातील महिला या कुठल्याही नेत्याच्या कार्यक्रम मध्ये गर्दी जमवण्याचं साधन न होता. त्याच सक्षमीकरण होणं गरजेचं आहे.
10/15 महिलांचा संच करण किंवा संघटित करण हाच यांचा उद्देश नाही तर या महिला सक्षमीकरण करणं, आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना सन्मान तेवढ्याच ताकतीने तिला मिळावा यासाठी पुढील 5 वर्षात काही करता येईल का हे बघणं हा माझा प्रयत्न असेल. बचत गट यांनी फक्त कमी व्याजात कर्ज मिळत म्हणून व्यवसाय न करतात. प्रतिकूल परिस्थिती ज्या प्रमाणे सावित्रीबाई लढल्या त्या ज्यामुळे आज महिलाना जे स्थान मिळाले आहे त्या प्रेरनेने महिलांनी काम कराव. या वर्षी प्रमाणे दर वर्षी अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री अमोल भोगले सहाय्यक प्रकल्प अधिकारी DAYNULM यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!