*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे यांच्या हस्ते फोंडाघाट येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स, व्होकेशनल अँड सायन्स, फोंडाघाट येथील वार्षिक स्नेहसंमेलन 2025–2026 मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाअंतर्गत पारितोषिक वितरण सोहळा शनिवार, दि. 03 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी श्री. संजयजी आग्रे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर न थांबता संस्कार, शिस्त, देशभक्ती व सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले. शिक्षण हे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांनी मेहनत, सातत्य व आत्मविश्वास यांच्या जोरावर यश संपादन करावे, असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी
श्री. महेशजी सावंत (चेअरमन, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट),
श्री. चंद्रशेखर लिंग्रस (सेक्रेटरी, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट),
श्री. विठोबा तायशेटे (खजिनदार, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट),
श्री. संदेश पटेल (शिवसेना विधानसभा प्रमुख, कणकवली),
संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, शिक्षकवर्ग, विद्यार्थीवर्ग तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्ग व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

