*’शाळा बचाव’ साठी ५ रोजी सिंधुदुर्गनगरीत मोर्चा*

*’शाळा बचाव’ साठी ५ रोजी सिंधुदुर्गनगरीत मोर्चा*

*कोंकण एक्सप्रेस*

*’शाळा बचाव’ साठी ५ रोजी सिंधुदुर्गनगरीत मोर्चा*

*सिधुदुर्गनगरी*

‘शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच’ची हाक ‘पटसंख्येवर आधारित’ शासन निर्णय रद्द करण्याची मागणी पटसंख्येवर आधारित शिक्षक संच मान्यता करण्याचा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा आणि बंद पडणान्या शाळा वाचवा, याकडे लक्ष वेधण्यासाठी ५ जानेवारी रोजी सिधुदुर्गनगरी येथे मोर्चा काढला जाणार आहे. ‘शाळा वाचवा शिक्षण चाचवा मंच, सिंधुदुर्ग वतीने या मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे
गावागावातील अनुदानित, शासकीय, प्राथमिक, माध्यमिक शाळा १५ मार्च २०२४ या शासन निर्णयान्वये बंद पडत चालल्या आहेत. पटसंख्येनिमित्त अनुदानित शाळा बंद करण्याचा हा सरकारचा डाव असून त्याला विरोध म्हगून सोमवारी सकाळी १०.३० वाजता ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तेजिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा होणार आहे. ग्रामस्थ, पालक, शिक्षण प्रेमी आणि विद्यार्थी यांचा यात सहभाग राहणार आहे
ज्या सरकारने अनेक जाचक शासन निर्णय आणून गत्वातील शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, ते शासन निर्णय रद्द करावेत किंबहुना त्यामस्ये सकारात्मक बदल करावेत जेणेकरून शिक्षणाचे विकेंद्रीकरण होऊनही खेडयातून शहराकडे जाणार नाही शाळा वाचल्या तर शिक्षण बाचेल. ग्रामीण जीवनामय्ये सकारात्मक बदल होईल. गावे ओस पडणार नाहीत, मुलीचे शिक्षण बांबणार नाही याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने केलेला उठाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी सहभाग घेऊन योगदान द्यावे. ज्या शाळामध्ये आपण शिकतो, त्या शाळा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलावीत गरीब कटकरी शेतकरी बहुजन समाजाचे शिक्षण तोडू नये. पासाठी सिंधुदुर्ग जिल्लामातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वतः म्हणून या मोर्चामध्ये सामील व्हावे, असे आवाहन शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच, सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय वैतुरेकर आणि सचिव महेश पाटोळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!