बालवाचनालयाला पुस्तक संचाची भेट

बालवाचनालयाला पुस्तक संचाची भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*बालवाचनालयाला पुस्तक संचाची भेट*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

पुस्तके ही ज्ञानार्जनाचे काम करतात. पुस्तकी ज्ञानाने मुलांची शैक्षणिक प्रगती होते. यासाठी शाळेतील मुलांनी या बाल वाचनालयातील पुस्तकांचे नियमित वाचन करावे असे प्रतिपादन श्री देव वेतोबा देवस्थान आरवलीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी केले.
श्री देव वेतोबा देवस्थान न्यास आणि भक्त परिवार यांच्यावतीने जीवन शिक्षण शाळा आरवली नं.1 येथील शिरिषकुमार बालवाचनालयाला पुस्तक संचाची भेट देण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यपिका कोकीतकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शिक्षिका सातपुते यांनी प्रास्तविक केले. देवस्थान कमिटीचे वि·ास्त डॉ.प्रसाद साळगांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपिठावर देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, वि·ास्त डॉ.प्रसाद साळगांवकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गजानन मेस्त्री, पालक शिक्षक संघाच्या सौ.दळवी, सौ.कर्णेकर व सौ.रगजी उपस्थित होते. शिक्षिका म्हाडगूत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!